Wednesday 25 April 2018

अत्तरगाथा भाग-२

संगीत आणि सुगंध यात खूपच साम्य आहे. जशी एखादी संगीतरचना आपल्या मनात एक विशिष्ट भाव निर्माण करते, तसेच एखादा गंध आपल्याला जुन्या आठवणीत घेऊन जातो. पर्फुमर जेव्हा एखादे पर्फुम तयार करतो तेव्हा त्याला त्या पर्फुम मधील नोट्सच्या माध्यमातून एक गंध महेफील साधायची असते. विविध गंधाची ही मेहफिल फुलवणं ही एक कला आहे आणि पर्फुमरच्या मनासारखे पर्फुम बनवायला त्याला अनेक ट्रायल्स कराव्या  लागतात ज्याला सहज ६ ते १२ महिन्याच्या कालावधी लागु शकतो.

कुठल्याही पर्फुम मध्ये ३ नोट्स असतात- टॉप नोट्स, मिड किंवा हार्ट नोट्स, आणि बेस नोट्स. जेव्हा सगळ्यात प्रथम आपण पर्फुम लावतो तेव्हा टॉप नोट्स मधील ऑइल्सचा वास आपल्याला येतो. तो साधारण पहिली १०-२० मिनिटे राहतो. त्याच्या नंतर मिड नोट्सचा वास यायला सुरुवात होते, जो साधारणतः १- २ तास राहतो. या नोट्सचा वास पूर्ण जायच्या आधीच बसे नोट्सचा वास यायला लागतो. या मधल्या काळात आपल्याला बेस आणि मिड नोट्सचा संमिश्र वास येतो, आणि मग हळूहळू मिड नोट्स अस्त पावून केवळ बेस नोट्स शेवट पर्यंत सुगंध देत राहतात.  या सगळ्या मागचे रसायन शास्त्र विचारात घेतले तर ज्या द्रव्यांचे मॉलिक्युल्स वजनाने हलके असतात, ते लवकर हवेत मिसळतात (टॉप नोट्स) आणि ज्या द्रव्यांचे मोलेक्युल्स वजनाने जड असतात ते सगळ्यात उशिरा हवेत मिसळतात (बेस नोट्स). आता आपल्या नेहमीच्या वापरातील पर्फुममध्ये कोणते गंध कोणत्या नोट्स बरोबर येतात ते पाहूया. 

टॉप नोट्स- मुख्यत: फळांचे वास टॉप नोट्स मध्ये मोडतात. Bergamot, लेमन, ऑरेंज, ग्रेपफ्रूट, बेरीज, लॅव्हेंडर, मिंट हे काही प्रसिद्ध टॉप नोट्सचे वास आहेत. 

मिड नोट्स ह्या जनरली फुलांचे वास घेऊन येतात. गुलाब, जाई, केवडा, नेरोली, जायफळ, लेमन ग्रास, लँग लँग ( चाफा), कोथिंबीर ह्या काही पॉप्युलर मिड नोट्स आहेत. 

बेस नोट्स या कायम खोल व गडद वासाच्या असतात. मुख्यतः लाकूड (चंदन, ओक, सिडर), तंबाकू, पचुली, व्हॅनिला, Oud (उद), अँबेरगीस(अंबर), कस्तुरी (मस्क) या सगळ्या बेस नोट्स आहेत. पर्फुमच्या स्वभावानुसार कधी कधी मिड नोट्स आणि बेस नोट्सची अदलाबदली होऊ शकते. जसे व्हॅनिलाचा गंध बऱ्याच लेडीज पर्फुममध्ये मिड नोट म्हणून वापरला आहे. 

पर्फुमचा स्थायीभाव - जसे शास्त्रीय संगीतात कुठलीही संगीतरचना ही एखाद्या रागावर बसलेली असते, त्याच प्रमाणे प्रयेक पर्फुमचा एक मूळ स्वभाव असतो. त्याला ऍकॉर्ड असे म्हणतात. पर्फुमर जेव्हा ३ नोट्सच मिश्रण करतो तेव्हा त्याच्या मनात एखादी ऍकॉर्ड पक्की असते, आणि त्याला अनुषंगूनच तो नोट्सची निवड करतो. आता या ऍकॉर्ड कशा बनतात हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. त्यासाठी पर्फुमरीचा कोर्स करावा लागेल. फ्रान्समध्ये अनेक कॉलजेस मध्ये हे पर्फुमेरीचे कोर्सेस शिकवले जातात.

नैसर्गिक दुर्मिळ सुगंध-

आता जरी रसायन शास्त्राच्या विकासामुळे बहुतांशी गंध हे सिन्थेटिकली प्रयोगशाळेत तयार करता येतात, तरीही नैसर्गिक सुगंधाची मागणी ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कायमच आहे, आणि यामुळे याची तस्करीही मोठ्या प्रमाणात चालते. असेच काही दुर्मिळ सुगंध-

Image result for ambergrisAmbergis (अंबर)- हे आपल्याला व्हेल माशाची एक दुर्मिळ जात-स्पर्म र्व्हेलच्या विष्टेतून, किंवा उलटीतून मिळते. हा पदार्थ व्हेलनी बाहेर टाकल्यावर पाण्यावर तरंगत किनाऱ्यापाशी येतो. पण पैशाच्या हव्यासापायी लोकं याची वाट न बघताच व्हेलसीची शिकार करून त्यांचे पोट कापून ambergis बाहेर काढतात. 

Image result for oud woodOud (ऊद/ अगर)- हे एका विशिष्ट प्रकारच्या झाडाला जर इन्फेकशन झालं, तर त्याच्या स्वरक्षणासाठी खोडात तयार होतं. ही झाडे भारतीय उपखंडात प्रामुख्याने आढळतात. भारत, श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, थायलंड इत्यादी देश Oud  ची निर्यात करतात. आखाती देशात याला खूप मागणी आहे. तिथे हे पर्फुम मध्ये न वापरता, त्याला जाळून त्याचा धूप घेतात. आपल्याकडील उदबत्ती, किंवा अगरबत्ती हे शब्द मुळात याच पदार्थासाठी वापरले जायचे. 












Image result for sandalwood trees
Sandalwood (चंदन) - चंदन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात महाग लाकूड आहे. चंदनाच्या तेलाला पर्फुमच्या बाजारात प्रचंड मागणी आहे. चंदनाचे झाड दक्षिण भारतात प्रामुख्याने आढळते. चंदनाची तस्करी तर आपल्या सर्वांना वृत्तपत्रात वाचून माहीतच आहे.



Musk (कस्तुरी)- हा सुगंध नर कस्तुरी मृगाच्या पोटातील ग्रंथींमधून मिळवतात. कस्तुरी मृगाच्या ७ जाती प्रामुख्याने काश्मीर, नेपाळ, सर्बिया, तिबेट येथे सापडतात. जवळजवळ सर्वच जेन्टस पर्फुममध्ये थोड्याबहुत प्रमाणात याचा वापर केला जातो.












No comments: