Tuesday 4 November 2008

In praise of Idleness

काल राजीव उपाध्ये यांनी केलेला Russel Bertrand यांच्या "In Praise of Idleness" या निबंधाचा स्वॆरानुवाद वाचला. आजच्या समाजात कष्टाला दिले गेलेले अवास्तव महत्व समाजाला कसे घातक आहे या विषयावरचा हा निबंध आहे. लेखकाच्या मतानुसार पुर्वापार श्रीमंत जमीनदार मंड्ळी, कष्ट करणे कसे चांगले, व कष्टातुन मिळवलेल्या पॆशाचा उपभोग घेणे, निवांतपणा अनुभवणे कसे वाईट आहे हेच कामगार वर्गाला पटवुन देत आले आहेत. यामुळे कामगारांच्यात आराम हा हराम आहे असा समज द्रुढ झाला आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा या श्रीमंत लोकांना झाला. या निबंधातील टाचण्यांच्या उत्पादनाचे उदाहरण समर्पक आहे. एकुणच हा लेख मनाला पुर्ण पटत नसला, तरी विचार करायला नक्कीच लावतो.
आपल्याला हा अनुवाद येथे वाचता येइल.
http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/08/in-praise-of-idleness.html
मुळ लेख वाचण्यासाठी येथे जावे
http://www.geocities.com/athens/oracle/2528/br_idle.htm

No comments: