Sunday, 8 April 2018

अत्तरगाथा - भाग-१


दुपारच्या रणरणत्या उन्हातून येऊन  तुम्ही घामेजुन बसला आहात आणि इतक्यात एक हवेची झुळूक तिच्याबरोबर मस्त सुगंध घेऊन येते आणि तुमचं  चित्त क्षणिक का होईना पण प्रसन्न करून जाते.. हा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी ना कधी आला असणार.

पर्फुम जी एकेकाळी चैनीची गोष्ट समजली जायची ती आजच्या यूथ साठी एक जीवनावश्यक बाब बनली आहे. आज जागतिक पर्फुम बाजारपेठ ही ३५ बिलियन अमेरिकन डॉलर्स आहे आणि २०२२ पर्यंत ती ७० बिलियन च्या घरात जाईल असा  अंदाज आहे.  फ्रान्स हा देश जगातली सगळ्यात उच्च प्रतिची पर्फुम बनवतो. फ्रान्सच्या दक्षिणेला असलेले एक छोटेसे शहर, गहास (Grasse) ही पर्फुमची जागतिक राजधानी समजली जाते. पर्फुम चा वापर मात्र सगळ्यात जास्त अमेरिकेत होतो.

भारतीयांना  सुगंधी द्रव्यं  नवीन नाहीत. आपल्याकडे अत्तर हे अरेबियन पेनिन्सुला मधून आले. इजिप्तमध्ये खूप पूर्वीपासून अत्तराचा वापर व्हायचा. आपल्याकडे मात्र अत्तर हे कायमच एक श्रीमती शौक म्हणून राजे रजवाड्यांपुरते मर्यादित होते. आज भारतात मुख्यतः मुसलमान समाजात अत्तराचा वापर जास्त आढळतो. भारतात अत्तर विक्रेते सुध्या मुसलमानच आहेत. आपल्याकडे फुलांपासून बनविलेली अत्तरे प्रसिद्ध आहेत. मुख्यतः मोगरा, चमेली, गुलाब, जस्मिन, चंदन, केवडा, वाळा असे सुगंध सर्रास आढळतात.

अत्तर आणि पर्फुम यात एक महत्वाचा फरक आहे. अत्तर हे एक सुगंधी तेल असते, जे विविध नैसर्गिक गोष्टींपासुन बनविले जाऊ शकते.  पर्फुम हे या विविध तेलांना, एका विशिष्ट प्रमाणात एकत्रित करुन त्यावर प्रक्रिया करून बनविलेले रसायन असते. पर्फुम्स मध्ये usually अल्कोहोलचा वापर कॅरिअर molecules म्हणून केला जातो ज्यामुळे आपल्याला फ्रॅग्रन्स प्रोजेक्ट झाल्याचे फील येते. अत्तरांमध्ये फक्त ऑईल्स असल्यामुळे त्याचा वास फार दूरपर्यंत जात नाही.

पर्फुमचे त्यातल्या सुगंधी ऑईल्सच्या कॉन्सन्ट्रेशन प्रमाणे ४ प्रकार पडतात-

१. स्प्रे किंवा मिस्ट - हे सगळ्यात माईल्ड असते, आणि यात सुगंधी ऑइल्सच्ये प्रमाण साधारणतः १-३% असते. उरलेले पाणी आणि अल्कोहोल.

२. उ द कलोन - २-४% (यात अल्कोहलचे प्रमाण  पाण्यापेक्षा जास्त्त असते)

३. उ द टॉयलेट - ५-१५%

४. उ द परफा- १५- २०%

अर्थात या पर्फुम्सची किंमत सुद्धा त्यातील ऑइलच्या  प्रमाणात वाढते. उ द परफा हे सगळ्यात महाग असते व ते अंगावर ६-८ तयार आरामात राहते.

पर्फुम मध्ये विविध ऑईल्स एकत्र करायची असल्यामुळे पर्फुम तयार करणे हि एक कला मानली जाते. जसे संगीतात विविध सूर एकत्र येऊन जादू निर्माण करू शकतात, पण जर चुकीचे सूर एकमेकांसोबत आले तर ते कानाला खटकतात , तसेच पर्फुमेचे आहे. जर एकमेकांना पूरक वास सोबत आले तर स्वर्गीय आनंद देऊन जातात, पण जर तिथे गल्लत झाली तर डोकेदुखी (literally) देतात.

पर्फुम अंगावर स्प्रे केल्यावर जसा एखादा राग उलगडत जावा त्याप्रमाणे त्या पर्फुम मधले गंध बाहेर पडू लागतात. या टप्पेवारीने बाहेर येणाऱ्या गंधांना नोट्स म्हणतात. या नोट्स बददल पुढील भागात.


No comments: